शेयर करा

19 19 19 fertilizer

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व खते आणि औषधांची माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण 19 19 19 या खता बद्दल (19 19 19 fertilizer) सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने 19:19:19 खतामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत, हे खत कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे, हे खत देण्याची मात्रा काय आहे, खत देण्याचे प्रकार, हे खत वापरण्याचे फायदे आणि या खताची किंमत याबद्दल या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की, हा लेख संपूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये देखील अवश्य शेयर करा.

शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट

समाविष्ट घटक 19% नायट्रोजन (N), 19% फॉस्फरस (P) आणि 19% पोटॅशिअम (K)
शिफारशीत पिके सर्व पिके
वापराची पद्धत

(19 19 19 fertilizer uses)

फवारणी किंवा आळवणी. (बेसल  डोस मध्ये वापरू नये.)
वापराचे प्रमाण

(npk 19 19 19 dosage)

फवारणी – 5 ग्रॅम / लीटर पानी 

आळवणी – 4 ते 5 किलो / एकर

सुसंगतता

(Compatibility)

फक्त कॅल्शियम मध्ये मिसळू नये. बाकी तुम्ही सर्व खते आणि औषधा बरोबर वापरू शकता.
प्रभाव कालावधी वापरानंतर 15-20 दिवस
वापरण्याची वेळ पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, म्हणजे पीक शाखिय वाढीमध्ये असताना.
किंमती

(19 19 19 fertilizer price)

1 किलो – 150 ते 200 रुपये

25 किलो – 1600 ते 1700 रुपये

19:19:19 खत वापरण्याचे फायदे | 19 19 19 fertilizer benefits

1. वनस्पती वाढीसाठी संतुलित पोषण –

👉19-19-19 खताचा एक महत्त्वाचा फायदा त्याच्या संतुलित पोषक रचनेत आहे.
👉नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे समान गुणोत्तर हे सुनिश्चित करते की वनस्पतींना प्रत्येक आवश्यक पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होतो.

2. हिरवाईला प्रोत्साहन देते –

👉19-19-19 खतामध्ये उच्च नायट्रोजन सामग्री विशेषतः हिरवीगार पानांच्या वाढीस चालना देण्यासाठी फायदेशीर आहे.
👉नायट्रोजन क्लोरोफिल चे उत्पादन उत्तेजित करते, त्यामुळे अधिक दोलायमान हिरवी पाने आणि वर्धित प्रकाश संश्लेषण होते.

3. मुळांचा विकास होतो –

👉19-19-19 खतामध्ये फॉस्फरसची उपस्थिती मुळांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.
👉वनस्पतींच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात, पोषक आणि पाणी शोषण्यासाठी मजबूत रूट सिस्टम आवश्यक आहे.
👉फॉस्फरस निरोगी आणि विस्तृत रूट नेटवर्कच्या निर्मितीमध्ये मदत करते, त्यामुळे वनस्पतींना जमिनीतून आवश्यक संसाधने मिळवता येतात.

4. फूल आणि फळांची वाढ होते –

👉फॉस्फरस आणि पोटॅशियम फुलांच्या आणि फळांच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
👉फॉस्फरस फुलांच्या कळ्या तयार करण्यास प्रोत्साहन देते आणि फुलांची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे अधिक मुबलक फुले येतात.
👉दरम्यान, पोटॅशियम फळांचा विकास करते, सुधारित चव आणि पौष्टिक सामग्रीसह मोठ्या आणि निरोगी फळांमध्ये योगदान देते.

5. दुष्काळ आणि ताण सहनशीलता सुधारते –

👉पोटॅशियम दुष्काळ आणि विविध पर्यावरणीय ताणांना वनस्पतीचा प्रतिकार सुधारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते.
👉जेव्हा वनस्पती मध्ये पोटॅशियमचे प्रमाण पुरेसे असते तेव्हा ते आव्हानात्मक परिस्थितीतही पाण्याचे योग्य संतुलन आणि टर्जिडिटी राखू शकतात.
👉याचा परिणाम दुष्काळ, उष्णता, थंडी आणि रोगांना सहनशीलता वाढविण्यावर होतो, त्यामुळे पिकांची लवचिकता वाढते.

6. पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते –

👉19-19-19 खतांचा संतुलित पोषक प्रोफाइल पीक उत्पादनात वाढ आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
👉वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यांवर वनस्पतींना आवश्यक घटकांचा पुरवठा करून, शेतकरी त्यांच्या पिकांची क्षमता इष्टतम करू शकतात आणि भरपूर कापणी सुनिश्चित करू शकतात.

npk 19 19 19 खत कोठे आणि कसे खरेदी करावे? | How to buy 19 19 19 fertilizer –

191919 हे खत तुम्हाला नजीकच्या कृषि सेवा केंद्रामध्ये अगदी सहज रित्या मिळू शकते. पण जर तुम्हाला हे खत ऑनलाइन खरेदी करायचे असल्यास तुम्ही BharatAgri Krushi Dukan ला भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला चांगला डिसकाऊंट देखील मिळेल आणि फ्री मध्ये घरपोच डिलीव्हरी देखील.

शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi Aushadhe (कृषि औषधे) या वेबसाइट वरील “19 19 19 fertilizer: वापर, फायदे आणि किंमत” हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या इतर खतांबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi Aushadhe या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. 19-19-19 खत काय काम करते?
उत्तर- 19-19-19 हे खत 100% विद्राव्य असून हे पिकामध्ये सुरुवातीच्या काळातील शाखिया वाढ चांगली करण्यासाठी वापरले जाते. सोबत रोपाच्या मुळांची देखील वाढ चांगली होते.

2. एनपीके 19 19 19 ची किंमत किती आहे?
उत्तर- एनपीके 19 19 19 ची किंमत ही प्रत्येक कंपनीनुसार वेग-वेगळी आहे पण हे तुम्हाला नजीकच्या कृषि सेवा केंद्रात अंदाजे 200 ते 250 रु. च्या दरम्यान मिळून जाईल.

3. एनपीके 19 19 19 चा उपयोग कसा करावा?
उत्तर- एनपीके 19 19 19 चा वापर तुम्ही फवारणी किंवा आळवणी (Drenching) च्या माध्यमातून करू शकता. वापराची मात्रा आहे – 5 ग्रॅम / लीटर पानी

4. 19:19:19 खत कोणत्या कंपनीचे चांगले आहे?
उत्तर- 19:19:19 खत तुम्ही महाधन, ग्रोमोर, जय किसान, यारा, ICL, ईएफसी, इफको किंवा आरसीएफ कंपनीचे वापरू शकतो. हे मार्केट मधील काही उत्कृष्ट ब्रॅंड आहेत ज्याच्या मध्ये सहसा भेसळ आढळत नाही.

5. 191919 हे खत किती किलो मध्ये मार्केट मध्ये उपलब्ध आहे?
उत्तर- 191919 हे खत तुम्हाला मार्केट मध्ये 1 किलो, 5 किलो आणि 25 किलो या साइज मध्ये पाहायला मिळेल.

6. एनपीके 19 19 19 आपण बेसल डोस मध्ये वापरू शकतो का?
उत्तर- एनपीके 19 19 19 चा वापर तुम्ही 5 ग्रॅम / लीटर पानी या प्रमाणे फवारणी तसेच 3 किलो / एकर याप्रमाणे आळवणी च्या माध्यमातून करू शकता.

7. एनपीके 19 19 19 पिकावर कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे?
उत्तर- एनपीके 19 19 19 चा वापर आपण पीक सुरुवातीच्या म्हणजेच शाखिया वाढीच्या अवस्थे मध्ये असताना करू शकतो. त्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते व पिकाला चांगला फुटवा येतो.

8. एनपीके 19 19 19 चे फवारणी मध्ये प्रमाण जास्त झाले तर त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो का?
उत्तर- नक्कीच, आपण पिकावर कोणतेही घटक प्रमाणापेक्षा जास्त वापरले तर त्याचा विपरीत परिणाम होतो. मग ते एखाद खत असो किंवा औषध. त्यामुळे नेहमी शिफारशीत मात्रा वापरावी.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top