शेयर करा

nativo fungicide

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushdhe (कृषि औषधे) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण बायर कंपनीच्या नेटिवो (nativo fungicide) या बुरशीनाशक बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार यामध्ये प्रामुख्याने नेटिवो मध्ये कोणते घटक असतात, कोणत्या पिकांसाठी याचा वापर होतो, याची वापरण्याची मात्रा किती आहे, नेटिवो बुरशीनाशक कोणत्या अवस्थेत वापरतात आणि याचा काय फायदा होतो हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

 

नेटिवो बद्दल थोडक्यात | About nativo fungicide-

नाव नेटिवो
कंपनीचे नाव बायर
घटक टेबुकोनाझोल ५०%+ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन २५% w/w WG (75 WG)
वापराची पद्धत फवारणी
सुसंगतता स्टिकर शी सुसंगत
किंमत ९०० रुपये / १०० ग्राम

 

नेटिवो बुरशीनाशक कोणत्या पिकावर वापरावे?

पीक रोग
भात करपा रोग
टोमॅटो पानावरील ठिपके आणि करपा
आंबा पांढरी भुरी आणि काळा करपा रोग
गहू नारंगी तांबेरा आणि पांढरी भुरी रोग
द्राक्ष पांढरी भुरी आणि काळा करपा रोग
मिरची पांढरी भुरी आणि काळा करपा रोग

 

नेटिवो वापराचे प्रमाण । Nativo bayer dose per acre –

पीक वापराचे प्रमाण (प्रती एकर)
भात 80 ग्रॅम
टोमॅटो 140 ग्रॅम
द्राक्ष 70 ग्रॅम
मिरची 100 ग्रॅम
गहू 120 ग्रॅम

 

नेटिवो पिकावर वापरण्याचे फायदे । Benefits of Nativo Fungicide –

१. याच्या मध्ये दोन घटक असल्यामुळे याचे परिणाम चांगले मिळतात.

२. हे बुरशीनाशक पिकावरील विविध रोग कंट्रोल करण्यासाठी वापरता येते.

३. हे पिकावर संपर्क आणि अंतर प्रवाही अश्या दोन्ही पद्धतीने कार्य करते.

४. एकदा वापरल्या नंतर पिकावर याचे दीर्घकाळ परिणाम दिसतात.

५. पावसाळी वातावरणात देखील याचे आपल्याला चांगले रिज़ल्ट दिसून येतात.

६. पिकाच्या सुरक्षेसह पिकाच्या एकूण उत्पादन वाढीमध्ये देखील याची चांगली मदत होते.

 

नेटिवो बुरशीनाशक कसे खरेदी करावे | How to buy nativo fungicide –

नेटिवो बुरशीनाशक अगदी सहजपणे जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध होईल. जर तुम्हाला हे घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायचे असेल तर तुम्ही पुढील लिंक वरती क्लीक करू शकता – Nativo

 

सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Aushdhe (कृषी औषधे)  या वेबसाइट वरील “nativo fungicide: नेटिवो बुरशीनाशकाची संपूर्ण माहिती डोस, उपयोग, फायदे आणि किंमत” हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

१. नेटिव्हो बुरशीनाशक म्हणजे काय?

उत्तर- Nativo हे दुय्यम घटक असलेल एक उत्तम बुरशी नाशक आहे. ज्यामध्ये आपल्याला टेब्युकोनाझोल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे २ घटक मिळतात. नेटिव्हो पिकावर संरक्षणात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते.

२. नेटिव्हो कधी वापरावे?

उत्तर – चांगले परिणाम मिळवण्यासाठी Nativo बुरशी नाशकाचा वापर रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करणे गरजेचे आहे.

३. नेटिव्हो कसे कार्य करते?

उत्तर – Nativo बुरशीनाशक पिकावर रोग नियंत्रणासाठी संरक्षणात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही पद्धतीने कार्य करत.

४. Nativo चा मालक कोण आहे?

उत्तर – फ्रेडरिक बायर यांच्या द्वारे 1 ऑगस्ट 1863 मध्ये बायर या कंपनीची स्थापना जर्मनी येथे करण्यात आली.

५.  Nativo ची किंमत किती आहे?

उत्तर – ९०० रुपये / १०० ग्राम

 

लेखक 

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com


शेयर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top