शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या शेती औषधे विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण बायर कंपनीच्या अँट्राकोल (antracol bayer) या बुरशीनाशकाबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार यामध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात, कोणत्या पिकांसाठी याचा वापर होतो, याची वापरण्याची मात्रा किती आहे, कोणत्या अवस्थेत वापरतात आणि याचा काय फायदा होतो हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट
नाव | अँट्राकोल (Antracol) |
समाविष्ट घटक | प्रोपिनेब 70% डब्ल्यूपी (propineb 70%WP) |
कंपनीचे नाव | बायर क्रॉप साइंस लिमिटेड (Bayer) |
प्रकार | स्पर्शजन्य बुरशीनाशक (Contact Fungicide) |
कार्य करण्याची पद्धत | अँट्राकोल बुरशीजन्य बीजाणूंची वाढ आणि विकास रोखून कार्य करते. बुरशीनाशक वापरल्यानंतर 14 दिवसांपर्यंत झाडांना उत्कृष्ट संरक्षण देते. |
शिफारशीत पिके व रोग | 1. सफरचंद :- खपल्या
2. डाळिंब:- पान / फळावर ठिपके 3. बटाटा: लवकर आणि उशीरा करपा 4. मिरची:- मररोग 5. टोमॅटो:- सड रोग 6. द्राक्षे:- केवडा रोग 7. तांदूळ:- पानांवर तपकिरी ठिपके |
वापरण्याची पद्धत | फवारणी |
वापरण्याचे प्रमाण | 1. सफरचंद, डाळिंब,बटाटा, टोमॅटो, द्राक्षे – 600 ग्रॅम / एकर
2. मिरची – 1000 ग्रॅम / एकर 3. तांदूळ – 600-800 ग्रॅम / एकर 4. कापूस – 500-600 ग्रॅम / एकर |
मिसळण्यास सुसंगत | सर्व घटकांबरोबर सुसंगत |
प्रभाव कालावधी | 15 दिवस |
किंमत
(antracol fungicide price) |
250 ग्राम ( 250 रुपये )
500 ग्राम ( 455 रुपये ) 1 किलो ( 1000 रुपये ) |
सेम घटक असलेले मार्केट मधील इतर प्रॉडक्ट | 1. Acoreli (Syngenta)
2. Kaushal (Tata) 3. Protocol (Dhanuka) 4. Aniki (IFFCO) 5. Outperform (Sumitomo) 6. Acrobat (BASF) |
अँट्राकोल बुरशीनाशक फवारणीनंतर कोणते फायदे होतात? | benefits of antracol bayer –
1. अँट्राकोल (antracol fungicide) बुरशीजन्य रोगांच्या विस्तृत श्रेणीवर प्रभावी आहे.
2. दीर्घकाळ टिकणारे संरक्षण – बुरशीनाशक वापरल्यानंतर 14 दिवसांपर्यंत संरक्षण देते.
3. लागू करणे सोपे – अँट्राकोल पर्णासंबंधी स्प्रे म्हणून किंवा ठिबक सिंचनाद्वारे लागू केले जाऊ शकते.
4. किफायतशीर – बाजारातील इतर बुरशीनाशकांच्या तुलनेत अँट्राकोल तुलनेने स्वस्त आहे.
5. पर्यावरणासाठी सुरक्षित -अँट्राकोल फायदेशीर कीटक, पक्षी किंवा सस्तन प्राण्यांना इजा करत नाही.
6. यामध्ये झिंक असते.झिंक असल्यामुळे हे वापरल्यावर पाने हिरवीगार होतात.
7. फुलवस्थेच्या टप्प्यात वापरल्यावर फुलांची संख्या वाढते.
8. हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते.
9. फळे व पानांवर ठिपके,लवकर व उशिरा येणारा करपा, फळकुज, मूळकूज आणि डाऊनी या सर्व रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्य करते.
10. हे बुरशीचे अंकुरने थांबवते. व तिची वाढ थांबवते.
11. हे सर्व फळ पिकांत व भाजीपाला पिकांत वापरू शकतो.
12. पिकांचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशक शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अँट्राकोल बुरशीनाशक (antracol fungicide) हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
13. त्याची कार्यपद्धती, दीर्घकाळ टिकणारे संरक्षण आणि वापरण्याची सुलभता यामुळे ती जगभरातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरते.
शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट
अँट्राकोल बुरशीनाशक वापरताना कोणती काळजी घ्यावी? –
1. जास्त आर्द्रता असताना किंवा झाडे ओली असताना अँट्राकोल वापरणे टाळा.
2. अवर्षण किंवा अति उष्णतेमुळे झाडे ताणतणावाखाली असताना अँट्राकोल वापरू नका.
3. अँट्राकोल बुरशीनाशक हाताळताना नेहमी संरक्षणात्मक कपडे घाला.
4. जास्त ऊन किंवा वारे जास्त वेगाने वाहताना Antracol वापरू नका.
5. हे वापरताना जमिनीत हलका ओलावा असेल याची काळजी घ्या.
6. हे वापरताना स्टिकर नक्की वापरा.
7. जे पानी तुम्ही फवारणीसाठी वापरणार आहात त्याचा ph – 6.5 ते 7.5 असेल याची काळजी घ्या.
8. फवारणी सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर घ्या.
अँट्राकोल बुरशीनाशक कसे खरेदी करावे? | How to buy antracol bayer?
अँट्राकोल बुरशीनाशक जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध होईल किंवा आपण हे ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करू शकता.
लिंक – BharatAgri Krushi Dukan
सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Aushadhe (कृषी औषधे) या वेबसाइट वरील antracol bayer ची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या बुरशीनाशकाबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या कृषि औषधे या वेबसाईटला नक्की भेट द्या.
शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. अँट्राकोल बुरशीनाशक कशासाठी वापरतात?
उत्तर- अँट्राकोल हे बुरशीनाशक सफरचंद पिकातील खपल्या, डाळिंब पिकातील पान / फळावरील ठिपके, बटाटा पिकातील लवकर आणि उशीरा करपा, मिरची वरील मररोग, टोमॅटो मधील सड रोग, द्राक्षे पिकातील केवडा रोग तसेच तांदूळ पिकातील पानांवर तपकिरी ठिपके नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.
2. अँट्राकोल मध्ये कोणते घटक आहेत?
उत्तर- अँट्राकोल मध्ये प्रोपिनेब 70% डब्ल्यूपी (propineb 70%WP) हा घटक आहे.
3. अँट्राकोल फवारणीचे प्रमाण किती आहे?
उत्तर – अँट्राकोलचा वापर तुम्ही 2 ग्राम/ लीटर पानी या प्रमाणे करू शकता.
4. अँट्राकोल ची किंमत किती आहे?
उत्तर- अँट्राकोलची (antracol price) अंदाजे किंमत 250 ग्राम ( 250 रुपये ), 500 ग्राम ( 455 रुपये ) व 1 किलो ( 1000 रुपये ) इतकी आहे.
5. अँट्राकोल कोणत्या कंपनीचे बुरशीनाशक आहे?
उत्तर – अँट्राकोल हे बायर कंपनीचे बेस्ट बुरशीनाशक आहे.
6. अँट्राकोल सोबत आपण औषध मिसळू शकतो?
उत्तर- अँट्राकोल (antracol fungicide) सोबत तुम्ही सर्व औषधे मिसळू शकता, परंतु वापरा अगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
7. अँट्राकोल बुरशीनाशकचे रिजल्ट कधी येतात?
उत्तर – अँट्राकोल वापरानंतर 2 ते 3 दिवसात रिजल्ट दिसतात. व ते पुढील 10 ते 12 दिवस राहतात.
8. अँट्राकोल कसे वापरावे?
उत्तर – याचा वापर तुम्ही फवारणी मधून करू शकता.
9. अँट्राकोलची फवारणी केल्यानंतर कोणते फायदे होतात?
उत्तर – अँट्राकोल फवारणी नंतर बुरशीजन्य रोग कंट्रोल होतात व याच्यामध्ये जिंक असल्यामुळे पिकावर काळोखी देखील येते.
10. अँट्राकोल कोठे मिळेल?
उत्तर- अँट्राकोल तुम्ही नजीकच्या कृषि केंद्रामध्ये किंवा ऑनलाइन BharatAgri Krushi Dukan मधून खरेदी करू शकता.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com