शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण एफएमसी कंपनीच्या कोराजन (coragen insecticide) या कीटकनाशकाबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने कोराजन मध्ये कोणते घटक असतात, कोणत्या पिकांसाठी याचा वापर होतो, याची वापरण्याची मात्रा किती आहे, हे कीटकनाशक कोणत्या अवस्थेत वापरतात आणि या कीटकनाशकाचे काय फायदा आहेत हे पाहणार आहोत.
शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट
नाव | कोराजन |
कंपनी | एफएमसी |
सामविष्ट घटक | क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी |
वापरण्याची पद्धत | फवारणी / आळवणी |
प्रमुख कार्य | पिकांचे आळीपासून संरक्षण करते |
प्रभाव कालावधी | 15 ते 20 दिवस |
मिसळण्यास सुसंगत | इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये |
पुनर्वापर आवश्यकता | किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते |
अतिरिक्त फायदा | कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय |
परिणाम करण्याची पद्धत | राईनोडाइन रीसेप्टर मोडूलेटर्स |
कोराजन कीटाकनाशकाचा पिकानुसार उपयोग | Coragen Insecticide Uses-
1. ऊस पीक – उसातील वाळवी , खोडकिडा आणि टॉप बोरर कीटकांच्या नियंत्रणासाठी आळवणी किंवा फवारणी करू शकता .
2. भात – खोड आळी आणि पाने गुंडाळणारी आळी
3. कोबी – डायमंड बॅक मॉथ
4. कापूस – अमेरिकन बॉलवर्म, स्पॉटेड बॉलवर्म
5. मक्का – आर्मी वर्म
6. वांगी – शेंडा आणि फळ पोखळणारी आळी
7. सोयबीन आणि तूर – शेंगा पोखरणारी आळी
8. हरभरा आणि उडीद – घाटे आळी
9. भेंडी आणि कारले टोमॅटो आणि मिरची — फळ पोखरणारी आळी
कोराजन कीटाकनाशक फायदे | Coragen Insecticide Benefits –
1. कोराजन (coragen) एक आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे आळी फवारणी संपर्कात आळी नाही आली तरी तिचा मृत्यू होतो .
2. हे औषध पूर्ण झाडात प्रवेश करते त्यामुळे आळी ने पान खाल्ले तरी तिचा मृत्यू होतो.
3. फळाच्या वाढीच्या अवस्थेत याची फवारणी केल्यास नुकसान कमी होते आणि उत्पादन 25 ते 30 टक्के वाढते.
4. फवारणीचा प्रभाव हा पिकात 15 ते 20 दिवस राहतो.
कोराजन कीटकनाशक डोज । Coragen insecticide dose –
फवारणी | 0.3 मिली / 1 लिटर 6 मिली / 15 लिटर 60 मिली / एकर |
आळवणी | ऊस – 150 मिली / 200 लिटर / एकर इतर पिके – 120 मिली / 200 लिटर / एकर |
कोराजन कीटकनाशक मार्केट मधील साधारण किंमत । Coragen insecticide price –
मार्केटमध्ये उपलब्ध मात्रा ( Available in market ) |
साधारण किंमत (Average price) |
10 मिली (coragen 10 ml price) | 180 रुपये |
30 मिली (coragen 30ml price) | 495 रुपये |
60 मिली (coragen 60 ml price) | 840 रुपये |
120 मिली (coragen 120ml price) | 1560 रुपये |
150 मिली (coragen 150ml price) | 2081 रुपये |
180 मिली (coragen 180ml price) | 2231 रुपये |
300 मिली (coragen 300ml price) | 3830 रुपये |
कोराजन कीटकनाशक कोठे मिळेल व कसे खरेदी करावे?
कोराजन (coragen) कीटकनाशक तुम्हाला नजीकच्या कृषि सेवा केंद्रामध्ये किंवा BharatAgri Krushi Dukan वरती सहजरित्या मिळून जाईल. जर तुम्हाला ही आताच ऑनलाइन खरेदी करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
लिंक – कोराजन कीटकनाशक
सूचना –
1. मार्केट नुसार किंमत कमी- जास्त होऊ शकते
2. वरील शिफारस केलेल्या पिका शिवाय फवारणी करू नये
3. हे कीटक नाशक फवारणी करतानी मास्क करावे कारण डोळ्यात गेल्यास
4. जळजळ होते व अंधुक दिसते आणि श्वसाद्वारे नाकात गेल्यास पाणी वाहते.
कोराजन प्रमाणेच घटक असणारी मार्केट मधील इतर कीटकनाशके –
1. शिमो (इफको)
2. कवर (धानुका)
3. रैपीजेन (Agrostar)
शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट
सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi Aushadhe (कृषि औषधे) या वेबसाइट वरील “कोराजन कीटकनाशक (coragen insecticide): उपयोग , फायदे , डोज आणि किंमत” हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या इतर खतांबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi Aushadhe या वेबसाईटला नक्की भेट द्या.
शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कोराजन कीटकनाशक कशासाठी वापरले जाते?
उत्तर – कोराजन कीटकनाशक सर्व आळी साठी फवारणी आणि आळवणी साठी वापर जाते .
2. कोराजन मध्ये कोणता घटक ( विष )आहे?
उत्तर – क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी
3. कोराजन कोणत्या कंपनीचे आहे?
उत्तर – एफएमसी
4. कोराजन कीटकनाशक कोणत्या पिकावर फवारणी करू शकता?
उत्तर – भात ,कोबी ,कापूस ,ऊस ,मक्का,टोमॅटो, मिरची ,वांगी ,तूर ,सोयबीन ,भेंडी ,कारले, उडीद आणि हरभरा.
5. कोराजन कीटकनाशक वापराची मात्रा किती आहे?
उत्तर- 60 मिलि / एकर
लेखक
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com