शेयर करा

polysulphate

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ICL या कंपनीच्या पॉलीसल्फेट (polysulphate) या खता बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर एक अभ्यासू शेतकरी असाल तर खास करून हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…

ICL (इस्रायल केमिकल लिमिटेड) बद्दल थोडक्यात | About ICL –

1. ICL (इस्रायल केमिकल लिमिटेड) ही एक इस्रायल मधील बहूराष्ट्रीय कंपनी आहे.
2. इस्रायल केमिकल्स लिमिटेड महणजेच (ICL) ही पोटॅश, ब्रोमाइन आणि इतर खनिज आणि रासायनिक संयुगे बनवणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यापैकी एक आहे.
3. एकूण जागतिक पोटॅश उत्पादनात कंपनीचा वाटा अंदाजे 11% आणि जागतिक ब्रोमिन उत्पादनात 35% इतका आहे.
4. ही कंपनी पश्चिमेकडील बाजारपेठेद्वारे वापरल्या जाणार्‍या प्राथमिक मॅग्नेशियमच्या 9 टक्क्यांहून अधिक उत्पादन देखील करते.
5. भारतामध्ये या कंपनीचे 21 हून अधिक उत्पादन प्लांट, 200 हून अधिक कृषि सल्लागार, 850 हून अधिक उत्पादने आणि 4 हून अधिक संशोधन सेंटर आहेत.

शेती-निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर

पॉलीसल्फेट बद्दल थोडक्यात | About Polysulphate –

नाव पॉलीसल्फेट
समाविष्ट घटक 1. पोटॅशियम ऑक्साईड 13.5%,

2. सल्फर 18.5%,

3. मॅग्नेशियम ऑक्साईड 5.5%,

4. कॅल्शियम ऑक्साईड 16.5%

कंपनीचे नाव आयसीएल (इस्रायल केमिकल लिमिटेड)
शिफारस सर्व पिकावर आणि पिकाच्या सर्व अवस्थेमध्ये
वापराची मात्रा 3 महीने पीक – 50 किलो / एकरी

6 महीने पीक – 75 किलो / एकरी

12 महीने पीक – 100 किलो / एकरी

वापराची पद्धत फक्त मातीमध्ये मिसळण्यासाठी शिफारशीत. ड्रिप ने सोडू नका. शक्यतो बेसळ डोस मध्ये द्यावे.
कश्यासोबत मिक्स करू शकतो सर्व खतासोबत मिक्स करू शकतो.
किंमत 25 किलो – 950 रुपये

50 किलो – 1800 ते 1900 रुपये

पॉलीसल्फेटमध्ये कोणते घटक आहेत?

1. पोटॅशियम ऑक्साईड 13.5%,
2. सल्फर 18.5%,
3. मॅग्नेशियम ऑक्साईड 5.5%,
4. कॅल्शियम ऑक्साईड 16.5%

पॉलीसल्फेटचे कसे वापरावे? | How to use icl polysulphate –

1. हे खत फक्त मातीमधून वापरण्यासाठी शिफारशीत आहे.
2. म्हणून याला तुम्ही बेसल डोस किंवा मातीमध्ये थेट विस्कटून टाकण्यासाठी वापरू शकता.
3. icl polysulphate हे तुम्ही सर्व पिकामध्ये व पिकाच्या सर्व अवस्थेमध्ये वापरू शकता.
4. याचे वापराचे प्रमाण हे 3 महिन्याच्या पिकासाठी – 50 किलो/एकरी, 6 महिन्याच्या पिकासाठी – 75 किलो/एकरी आणि 12 महिन्याच्या पिकासाठी – 100 किलो/एकरी इतके आहे.
5. याचा वापर शक्यतो ड्रिप मधून करू नये.

पॉलीसल्फेटचे फायदे | polysulphate fertilizer benefits –

1. पिकाला सर्व मुख्य अन्नद्रव्य एकाच बॅगमध्ये मिळतात.
2. poly sulphate हे आपल्याला मार्केट मध्ये पाऊडर आणि दानेदार अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध होते.
3. दीर्घकाळ मातीमध्ये राहते व वाया जात नाही.
4. सर्व घटक सल्फेट स्वरूपात पिकाला उपलब्ध होतात.
5. polysulphate मध्ये क्लोराइड ची मात्रा अतिशय कमी आहे.
6. आणि याचा ph देखील न्यूट्रल आहे.
7. याच्यामध्ये क्षाराचे प्रमाण देखील कमी आहे.
8. 100% नैसर्गिक प्रॉडक्ट आहे.
9. पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी बेस्ट प्रॉडक्ट आहे.

आयसीएल पॉलीसल्फेट खत कुठे मिळेल? How to buy polysulphate –

आयसीएल पॉलीसल्फेट (polysulphate fertilizer ) खत पाहिजे असल्यास जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये संपर्क साधावा किंवा 9168911489 या क्रमांकावर संपर्क करावा.

सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Aushadhe या वेबसाइट वरील आमचा आयसीएल पॉलीसल्फेट (polysulphate) या खताबद्दल लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या इतर खतांबद्दल माहिती पाहण्यासाठी आमच्या krushiaushadhe.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

शेती-निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर

शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. पॉलीसल्फेट खत म्हणजे काय?
उत्तर – पॉलीसल्फेट हे एक ICL कंपनीचे नामांकित खत आहे.ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम ऑक्साईड 13.5%, सल्फर 18.5%, मॅग्नेशियम ऑक्साईड 5.5% आणि कॅल्शियम ऑक्साईड 16.5% हे घटक मिळतात.

2. पॉली सल्फेट हे सर्वोत्तम खत का आहे?
उत्तर – कारण यामध्ये आपल्याला पोटॅशियम ऑक्साईड 13.5%, सल्फर 18.5%, मॅग्नेशियम ऑक्साईड 5.5% आणि कॅल्शियम ऑक्साईड 16.5% असे 4 वेग-वेगळे घटक मिळतात. व याचे रिजल्ट देखील अतिशय उत्तम आहेत.

3. पॉलीसल्फेट सेंद्रिय आहे का?
उत्तर – होय, पॉलीसल्फेट हे 100% खनिजापासून बनवलेले खत आहे. या मध्ये कोणताही इतर रासायनिक घटक नाही.

4. पॉली सल्फेट कसे लावायचे?
उत्तर – हे खत तुम्ही फक्त मातीमध्ये मिसळण्यासाठी वापरू शकता. ड्रिप ने सोडू नका. शक्यतो बेसळ डोस मध्ये द्यावे.

5. पॉलीसल्फेटमध्ये कोणते घटक आहेत?
उत्तर – या मध्ये एकूण 4 घटक आहेत. जसे की – पोटॅशियम ऑक्साईड 13.5%, सल्फर 18.5%, मॅग्नेशियम ऑक्साईड 5.5% आणि कॅल्शियम ऑक्साईड 16.5% .

6. पॉलीसल्फेट ची किंमत किती आहे?
उत्तर – पॉलीसल्फेट ची मार्केट मधील अंदाजे किंमत ही 25 किलोसाठी – 950 रुपये आणि 50 किलोसाठी – 1800 ते 1900 रुपये इतकी आहे.

7. पॉलीसल्फेट कोठे मिळेल?
उत्तर – आयसीएल पॉलीसल्फेट खत पाहिजे असल्यास जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये संपर्क साधावा किंवा 9168911489 या क्रमांकावर संपर्क करावा.

8. पॉली सल्फेट मुळे कोणता फायदा होतो?
उत्तर – पॉलीसल्फेट वापरामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.

9. पॉलीसल्फेट कोणत्या कंपनीचे आहे?
उत्तर – पॉलीसल्फेट हे आयसीएल (इस्रायल केमिकल लिमिटेड) कंपनीचे नवीन आधुनिक आणि नाविन्यपूर्ण बहु-पोषक खत आहे.

10. पॉली सल्फेट किती किलो मध्ये उपलब्ध आहे?
उत्तर – हे खत तुम्हाला मार्केट मध्ये 25 आणि 50 किलो मध्ये उपलब्ध आहे. आणि हे खत तुम्हाला पाऊडर आणि दानेदार अशा दोन्ही स्वरूपात मिळेल.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com


शेयर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top