शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या कृषि औषधांबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण npk 0 52 34 या खता बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने 0 52 34 खतामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत, हे खत कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे, हे खत देण्याची मात्रा काय आहे, हे खत वापरण्याचे फायदे आणि या खताची किंमत याबद्दल या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर एक अभ्यासू शेतकरी असाल तर हा लेख वाचने तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.चला तर मग सुरू करुयात …
npk 0 52 34 बद्दल थोडक्यात –
नाव | npk 0 52 34 (मोनो अमोनियम फॉस्फेट) |
समाविष्ट घटक | 52% फॉस्फरस (P) आणि 34% पोटॅशियम (K) |
वापराची पद्धत | फवारणी किंवा आळवणी/ड्रिप |
वापराची मात्रा
(npk 0 52 34 dose) |
फवारणी – 5 ग्रॅम / लीटर पानी
आळवणी/ड्रिप – 3 ते 5 किलो / एकर |
वापराची वेळ | फूल आणि फळ लागण्याची अवस्था |
शिफारशीत पीके | सर्व पीके |
मार्केट मध्ये उपलब्ध असलेली साइज | 1 किलो आणि 5 किलो |
किंमत
(00 52 34 price) |
1 किलो – 230 ते 260 रुपये
25 किलो – 2300 ते 2500 रुपये |
एन पी के 0:52:34 पिकावर वापरण्याची योग्य पद्धत –
1. npk 05234 हे एक 100% विद्राव्य खत आहे.
2. याचा वापर तुम्ही पिकाच्या फूल किंवा फळ अवस्थे मध्ये करू शकता.
3. npk 0-52-34 खत आपण फवारणी किंवा आळवणी अशा दोन्ही पद्धतीने पिकाला देऊ शकतो.
4. सुरुवातीला न्यूट्रल ph चे पानी घ्या म्हणजे ज्या पाण्याचा फ 6.5 ते 7.5 आहे असे पानी.
5. त्यामध्ये फवारणी साठी – 3 ते 5 ग्राम / लीटर पाण्यात किंवा आळवणी साठी – 3 ते 5 किलो / एकरी / 200 लीटर पाण्यात 0 52 34 मिसळा.
6. तुम्हाला जर उत्तम रिजल्ट हवे असतील तर स्टीकर नक्की मिसळा.
7. तयार द्रावणाचा वापर तुम्ही सकाळी 11 च्या अंत किंवा सायंकाळी च्या नंतर करू शकतो.
शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट
NPK 0 52 34 खत पिकामध्ये वापरण्याचे फायदे –
1. हे सर्व पिकांसाठी उपयुक्त असे विद्राव्य खत आहे.
2. npk 0 52 34 फळाचा आकार, रंग आणि चव सुधारण्याचे काम करते.
3. सोबतच हे फूल आणि फळांची संख्या देखील वाढवण्यामध्ये मदत करते.
4. तुम्ही याच्यामध्ये सर्व प्रकारची कीटकनाशके आणि बुरशी नाशके मिसळू शकता. त्यामुळे आपल्याला एकाच फवारणीमध्ये अनेक हेतु साध्य करता येतात.
एनपीके 0 52 34 कोठे आणि कसे खरेदी करावे?
0 52 34 हे खत जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध होईल किंवा आपण BharatAgri App मधून हे खत घर बसल्या खरेदी करू शकता. हे खत जर तुम्हाला आताच ऑनलाइन खरेदी करायचे असल्यास पुढे दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. लिंक – एनपीके 0 52 34
npk 0 52 34 च्या मार्केट मधील काही नामांकित कंपन्या –
1. Indian Farmers Fertiliser Cooperative (IFFCO)
2. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड
3. जिओलाइफ एग्रीटेक इंडिया प्रा. लि.
4. कोरोमंडल इंटरनॅशनल
5. यारा इंटरनॅशनल
6. झुआरी फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि.
7. आयसीएल स्पेशालिटी फर्टिलायझर्स इंडिया.
8. हैफा ग्रुप
9. महाफीड स्पेशलिटी फर्टिलायझर्स (इंडिया) प्रा. लि.
10. IFC (Indian Farmer Company)
एन पी के 0:52:34 हे खत कश्या सोबत मिसळावे व कश्या सोबत मिसळू नये –
मिसळावे | कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य |
मिसळू नये | कॅल्शियम आणि बोरॉन |
सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Aushadhe या वेबसाइट वरील npk 0 52 34: वापर, फायदे आणि किंमत हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या खतांबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushiaushadhe.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. 00 52 34 काय काम करते?
उत्तर – फळाचा आकार, रंग आणि चव सुधारण्याचे काम करते. तसेच फूल आणि फळांची संख्या देखील वाढवण्यामध्ये मदत करते.
2. 00 52 34 कधी टाकावे?
उत्तर – याचा वापर तुम्ही पीक फुलोरा अवस्थेमध्ये असताना करू शकता.
3. 0 52 34 कोणत्या कंपनीचे खरेदी करावे?
उत्तर – हे तुम्ही महाधन, icl, यारा, ग्रोमोर, जय किसान, ifc किंवा इफको कंपनीचे खरेदी करू शकता.
4. 00 52 34 ची किंमत किती आहे?
उत्तर –
5. 00:52:34 किती वापरावे?
उत्तर – 1 किलो – 230 ते 260 रुपये आणि 25 किलो – 2300 ते 2500 रुपये
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com