शेयर करा

sempra herbicide

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण धानुका कंपनीच्या सेम्प्रा तणनाशक बद्दल (sempra herbicide) सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने सेम्प्रा मधील घटक, वापर, फायदे आणि किंमत बद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.

सेम्प्रा तणनाशका बद्दल थोडक्यात । About Sempra –

1. भारतात प्रथम लव्हाळा नियंत्रणासाठी धानुका कंपनीने सेम्प्रा हे तणनाशक (sempra dhanuka) तयार केले आहे.
2. हे तणनाशक दोन प्रकारे काम करते म्हणजे झाइलेम आणि फ्लोएम.
3. हे फवारणी नंतर निवडक आणि आंतरप्रवाही (post emergence herbicide) पद्धतीने काम करते. ही आपण लागवडीनंतर सुद्धा वापरू शकतो.
4. या मध्ये (sempra herbicide content) हॅलोसल्फोरॉन मिथिल 75% डब्लूजी (Halosulfuron Methyl 75%WDG) हा घटक आहे .

नाव  सॅम्प्रा (Nut grass – Cyperus rotundus)
समाविष्ट घटक  हॅलोसल्फोरॉन मिथिल 75% डब्लूजी
वापरण्याची पद्धत फवारणी
प्रमुख कार्य फक्त लव्हाळा नियंत्रण 
प्रभाव कालावधी कमीत कमी – 21 दिवस व जास्तीत जास्त – 3 महीने. 
मिसळण्यास सुसंगत कोणत्याही रसायनात मिसळू नका
तन नाशक प्रकार  निवडक तणनाशक 

सेम्प्रा तणनाशकाचा उपयोग । sempra herbicide uses in marathi –

1. सेम्प्रा तणनाशकाचा उपयोग दोन पिका मध्ये लव्हाळा नियंत्रणसाठी केला जातो. नागर मोथा) साठी करतात. पहिले मक्का आणि दुसरे ऊस हि दोन पिके आहेत .
2. या व्यतिरिक्त मोकळ्या शेतामध्ये सुद्धा लव्हाळ्या साठी आपण सेम्परा तणनाशक (dhanuka sempra) वापर करू शकतो.

शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट

सेम्प्रा तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची खबरदारी | Precautions to be taken while spraying Sempra –

1. चांगल्या परिणामासाठी 30 से 40 दिवस जमिनीत ओलावा असणे आवश्यक असतो .
2. जमीन मध्ये वाफसा असेल तेव्हाच आपण फवारणी करावी कारण वाफसा असेल तर औषध मूळापर्यंत जाऊन लव्हाळा चांगला मारतो.
3. आपण जर मोकळ्या शेतात फवारणी करत असाल आणि लव्हाळा सोडून इतर तण असेल तर 2 -4 डी – 58 % त्याबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता.
4. सेम्प्रा तणनाशक (sempra) फवारताना डोज कमी जास्त करू नका योग्य ती मात्र असावी तरच आपल्याला योग्य परिणाम दिसतील.
5. पाण्याचा पीएच 7 पेक्षा जास्त नसावा.
6. ऊस व मका लागवडीनंतर 15-20 दिवसानंतर किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिंचनामध्ये, लव्हाळा तणाची अवस्था 3-6 पानाची अवस्था असताना फवारणी करावी.
7. एकसमान फवारणीसाठी फ्लॅट फॅन / फ्लड जेट नोजल वापरा.
8. परिणाम- पानांवर पिवळसर आणि टिप बर्न शो 15 दिवसांनी दिसायला लागेल आणि फवारणीनंतर 30 दिवसांच्या आत लव्हाळा मरतो .

सेम्प्रा तणनाशकाची फवारणी फायदे । Advantages of Sempra herbicide spray –

1. उत्पन्न वाढवा: सेम्प्रामुळे अधिक उत्पन्न मिळते त्यामुळे अधिक नफा.
2. तणनाशकाचा कमी खर्च: सेम्प्रा वारंवार हाताने खुरपणी करण्यापासून मुक्ती देते ज्यामुळे तणनाशकांच्या वापरामध्ये हाताने मजुरीचा खर्च वाचतो.
3. पिकासाठी सुरक्षित: सेंप्रा ऊस आणि मक्याच्या पिकाला हानी पोहोचवत नाही.
4. मजबूत मातीची अवशिष्ट क्रिया: सेम्प्रामध्ये मजबूत अवशिष्ट क्रिया आहे ज्यामुळे ते नवीन अंकुरित सायपरस रोटंडस नियंत्रित करते.

सेम्प्रा तणनाशकाची फवारणी साठी मात्रा । sempra herbicide dose –

मात्रा (Dose)  पाण्याची मात्रा (Water quantity)
सेम्प्रा 0.24 ग्राम  1 लिटर पाणी 
सेम्प्रा 3.6 ग्राम  15 लिटर पाणी
सेम्प्रा 18 ग्राम 75 ते 100 लिटर पाणी
सेम्प्रा 36 ग्राम  150 ते 200 लिटर पाणी

सूचना – मोकळ्या शेतात फवारणी करताना आपण सेम्प्रा (sempra) सोबतच इतर सर्व तण नियंत्रित करण्यासाठी 2-4 डी 58% मधील – 400 ते 500 मिली / एकर वापरू शकता.

सेम्प्रा तणनाशकाची किंमत । sempra herbicide price –

मार्केटमध्ये उपलब्ध मात्रा

(Available size in market) 

साधारण किंमत

(Average price)

3.6 ग्राम (sempra 3.6gm)  225 
18 ग्राम  (sempra 18gm)  850
36 ग्राम  (sempra 36gm)  1415
72 ग्राम  (sempra 72gm)  2826

सेम्प्रा तणनाशक कोठे मिळेल व कसे खरेदी करावे? । Where to find and how to buy Sempra herbicide?

सेम्प्रा (sempra herbicide) तणनाशक तुम्हाला नजीकच्या कृषि सेवा केंद्रामध्ये किंवा BharatAgri Krushi Dukan वरती सहजरित्या मिळून जाईल. जर तुम्हाला ही आताच ऑनलाइन खरेदी करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

लिंक – सेम्प्रा तणनाशक

सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi Aushadhe (कृषि औषधे) या वेबसाइट वरील “सेम्प्रा तणनाशक (sempra herbicide): माहिती ,उपयोग , फायदे , डोज आणि किंमत” हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या इतर खतांबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi Aushadhe या वेबसाईटला नक्की भेट द्या.

शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट

शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारलेले जाणारे प्रश्न –

1. सेम्प्रा तणनाशक कोणत्या कंपनी चे आहे?
उत्तर – धानुका कंपनी

2. सेम्प्रा तणनाशकाची फवारणी कोणत्या पिकामध्ये करू शकता?
उत्तर – मक्का आणि ऊस आणि मोकळ्या शेतात .

3. सेम्प्रा तणनाशकाची फवारणी साठी एकरी मात्र किती असावी?
उत्तर – 34 ग्राम / एकर

4. सेम्प्रा तणनाशकाची फवारणी केल्यानंतर परिणाम किती दिवसात दिसतात?
उत्तर – कमीत कमी 15 दिवस आणि जास्तीत जास्त 30 दिवसात परिणाम दिसतात.

5. सेम्प्रा तणनाशकाची फवारणी मक्का आणि ऊस पिकात कधी करावी?
उत्तर – लागवडी नंतर 15 ते 20 दिवसांनी .

6. सेम्प्रा तणनाशकामध्ये कोणता घटक आहे?
उत्तर – हॅलोसल्फोरॉन मिथिल 75% डब्लूजी.

लेखक

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com


शेयर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top